अनर्थ टळला; सुप्रिया सुळे यांच्या साडीला लागली आग

पुणे, १५ जानेवारी २०२३ : रोज अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावून जनसंपर्क वाढविण्याचा सपाटा लावलेल्या सुप्रिया सुळे यांच्या साडीला द्वीप प्रज्वलन करताना अचानक आग लागली. मात्र प्रसंग अवधान ओळखून ही आग लगेच विझविण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात खडकवासला विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क करण्याचा कायमच भर असतो. खडकवासला मतदारसंघातून सुळे यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसत आहे. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक आम्हीच जिंकणार असा दावा भाजप करतो. खडकवासला मतदारसंघातील लोकांचे मतपरिवर्तन व्हावे, राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करावे यासाठी सुप्रिया सुळे हे लहान मोठ्या घरगुती कार्यक्रमाला देखील आवर्जून उपस्थित असतात. येथील सोसायट्यांच्या समस्या त्या जाणून घेतात. कचरा, पाणी, रस्ते, ड्रेनेज, वीज या इतर प्रश्नांवर त्यांची कायम आंदोलन होत असतात.

सुप्रिया सुळे यांचा आज हिंजवडी येथे एका कराटे कोचिंग क्लासेसचे उद्घाटन करण्यासाठी गेल्या होत्या. उद्घाटन करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर द्वीपप्रज्वलन केले जात होते. त्यावेळी त्यांच्या साडीच्या पदराला आग लागली. उपस्थितांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी लगेच करून ही आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला यामध्ये सुप्रिया सुळे यांना कुठे इजा झाली नाही. मात्र या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.