घाणेरड्या राजकारणाची सुरवात पवारांनीच केली – राज ठाकरे
पुणे, ४ जुलै २०२३ ः महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे तो किसळवाणा प्रकार आहे. पुलोदचा प्रयोग करून या या घाणेरड्या राजकारणाची सुरवात शरद पवार यांनी केली होती, आता शेवटही त्यांच्याकडेच जात आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असून, त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले, जे झालंय ते अत्यंत किळसवाणे आहे, हा मतदारांचा घोर अपमान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात घरात शिव्या ऐकू येतील. या गोष्टींबद्दल मी सविस्तर भूमिका मेळाव्यात मांडणार आहे. महाराष्ट्रात आमदार फोडण्याची सर्वात पहिली सुरवात शरद पवार यांनी १९७८ मध्ये पुलोदच्या प्रयोग करून केली. त्यापूर्वी असे महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते. त्यामुळे सुरवात पवार साहेबांनी केली आणि शेवट त्यांच्याकडेच झाला.
प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत जाणारी माणसं नाहीत. हे सर्व अनाकलनीय आहे. या गोष्टी बहुधा त्यांनीच हे पेरले असाव्यात. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून दिसल्या तरी आश्चर्य वाटणार नाही. एका दिवसात हे घडलेले नाही. फार आधीपासून प्लॅन सुरू असणार. त्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये शंकेला जागा आहेत.
सध्या कोण कुठे आहे, कोणत्या पक्षात आहे हे काहीच सांगता येत नाही. कॅरमचा डाव इतका विचित्र फुटला आहे की कोणत्या सोंगट्या कोणत्या भोकात आहेत हेच सांगता येत नाही असा टोला लगावत सध्या घड्याळाने काटा काढला की काट्याने घड्याळ काढले हेच कळत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप