देवेंद्र फडणवीस यांचा अचानक पुणे दौरा
पुणे, ७ सप्टेंबर २०२२: एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde येत असताना त्या पूर्वी काही तास आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra fadnavis यांनी पुण्यात Pune हजेरी लावली. त्यावर त्यांनी हा माझा राजकीय दौरा नाही तर उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यासाठी मी पुण्यात आलो आहे, असे सांगत उमाजी नाईक यांच्या स्मारकाच्या विकासाकडे आम्ही लक्ष देणार आहोत असेही स्पष्ट केले.
गणेशोत्सवानिमित्त Ganesh festival पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यातले मंत्री minister व इतर व्हीआयपी VIP लोकांची सतत भेटी सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवात महत्त्वाच्या मंडळांना भेटी दिल्या होत्या त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत मानाच्या गणपतीसह बारा गणपतींना शिंदे भेट देणार आहेत त्यामुळे मध्यवस्तीमध्ये प्रचंड प्रमाणात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे त्याचा परिणाम नागरिकांना भोगाव लागत असून मध्यवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी प्रशासनाची गडबड सुरू असताना आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौरा आयोजित केला राजे उमाजी नाईक यां यांना फडणवीस यांनी अभिवादन केले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ” आजचा माझा दौरा राजकीय दौरा नाही. राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यासाठी मी आलो आहे. रामोशी समाजाचे मोठे योगदान आहे पण काही कारणामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्यात आले नाही. मात्र आताचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काही योजना आणणार आहे.