बागेश्वर बाबाच्या दरबारात – देवेंद्र फडणवीसांची हजेरी

पुणे, २२ नोव्हेंबर २०२३ : सनातन धर्म रुढीवादी, जातीयवादी असल्याचा अपप्रचार काही लोक करतात. सनातन म्हणजे अनादी आणि अनंत. सनातन धर्म सगळ्यांना जोडणारा आहे. तिथे उच्च नीच असा भेदभाव नाही. सर्व ईश्वरांची मुले आहेत. हा भारताचा विचार आहे. असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

जगदीश मुळीक फाऊंडेशन तर्फे आयोजित देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंडित धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या मंत्रमुग्ध अमृतवाणीतून ‘हनुमान कथा सत्संग’ कार्यक्रमाचे संगमवाडी येथे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आयोजक जगदीश मुळीक, योगेश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘ सर्व देश जागा होतोय. भारत जागा झाला तर जग जा. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत प्रभू रामचंद्राचे मंदिर होत आहे. ज्या ठिकाणी राम लल्ला विराजमान होते त्याच ठिकाणी हे मंदिर होत आहे. ज्याला प्रभू रामचंद्र ची कथा ऐकण्याची संधी मिळते त्याचे जीवन सफल होते.