चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेली पदवी नियमानुसार – मुंबई विद्यापीठ
मुंबई, १३/०४/२०२३: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिद्धार्थ महाविद्यालयातून एप्रिल १९८० साली बीकॉमची पदवी संपादन केली. त्यांची मूळ पदवी गहाळ झाल्यामुळे त्यांनी पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत ( Duplicate) प्राप्त करण्यासाठी विद्यापीठाकडे अर्ज केल्यानंतर विद्यापीठाने नियमानुसार सर्व
प्रक्रिया करून त्यांना दुय्यम पदवी दिली.
सदरची पदवी जुनी असल्याने ती मॅन्युअली असते. ती बाहेर प्रिंटिंग साठी पाठविली जात नाही. ती विद्यापीठ स्तरावर तयार केली जाते. या जुन्या पदवीचे फॉरमॅट तयार असतात. यावर विद्यार्थ्यांचा तपशील हस्ताक्षराने लिहिला जातो. यामुळे ही पदवी एका दिवसात तयार होते. अशा प्रकारे यापूर्वी काही विद्यार्थ्यांना कमी वेळात पदवी प्रमाणपत्र दिली आहेत. या पदवीसाठी ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणताही दबाव आलेला नाही.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप