मराठा आरक्षणाचा वाद लढा तीव्र, जरांगे पाटील यांची बीडमध्ये पहाटे तीन वाजता सभा

बीड, ९ ऑक्टोबर २०२३: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर सभा होत आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्ते उत्साहाने त्यांचे स्वागत करत असताना नियोजित सभेला जाण्यास त्यांना बराच उशीर होत आहे. अशा स्थितीत देखील मराठा समाजाचे लोक त्यांची वाट पाहत आहेत. बीड येथील सभा सायंकाळी सहा वाजता होणार असताना येण्यास तब्बल नऊ तास उशीर झाला मध्यरात्री तीन वाजता बीड ते जिरांगे पाटील यांचे सभा संपन्न झाली.

मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात निर्णय घेत आरक्षण दिले होते. पण न्यायालयात हे आरक्षण टिकू शकले नाही. त्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक तज्ञांच्या मते मराठा समाज त्यांचे आर्थिक मागासले पण सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे आरक्षण मिळणे कठीण आहे असा दावा केला जात आहे. मात्र दुसरीकडे जरांगे पाटील नावाचा साधा कार्यकर्ता निजामाच्या काळात मराठ्यांना कुणबीच आरक्षण होतं तेच आरक्षण पुन्हा लागू करावा या मागणीसाठी त्यांनी १४ दिवस उपोषण केले राज्य सरकारने बरेच प्रयत्न करून त्यांचे उपोषण मागे घेतले. त्यानंतर मराठ्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने एका महिन्याच्या आत निर्णय घ्यावा असे बजावत जरंगे पाटील यांनी राज्यभर संवाद यात्रा सुरू केलेली आहे. यावेळी पाटील यांची ठिकठिकाणी जंगी स्वागत होत असून नुकत्याच एका सभेत ५१ जेसीबीमधून गुलाल आणि फुले फेकून स्वागत करण्यात आले.

जरांगे पाटील यांची सभा रविवारी सायंकाळी बीड शहरात आयोजित केली होती. त्यासाठी बीड जिल्ह्यातील गावांमध्ये हजारो लोक शहरात आलेले होते त्यापूर्वी रांगे पाटील यांची सभा सोलापूर येथे होती. ही सभा संपण्यास उशीर झाला त्यानंतर बीडच्या दिशेने ते निघत असताना त्यांचे ठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जरंगे पाटील थांबत आल्याने सभेची वेळ उलटून गेली सभा ४० तासात सुरू होईल. यामुळे नागरिक महिला त्यांची वाट पाहत थांबले.

अखेर जरांगे पाटील हे मध्यरात्री तीन वाजता बीड शहरात आले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले जरांगे पाटील म्हणाले, “तुम्ही माझ्यासाठी उशिरापर्यंत थांबून आहात मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. पण आरक्षण मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही आज बीड मधील सभा ही ४९ वी सभा आहे अजून बऱ्याच ठिकाणी फिरायचे आहे मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही.