शिंदे गटात वाद; एकनाथ शिंदेंनी शिरसाठ यांना पुन्हा डावले

 

मुंबई, १४ सप्टेंबर २०२२:

मुंबईसह राज्यात होणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या आदेशानुसार, नेतेपदी शिवसेनेचे पाच तर २६ उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

मात्र, शिरसाट आणि सरदेसाई यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळा शिरसाटांच्या नाराजीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉल मध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत. गेल्या दि,२९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण ९ विभागप्रमुखांच्या नियुक्त्या जाहिर केल्या होत्या. दरम्यान, नेतेपदी आणि उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत.

 

शिवसेना नेतेपदी रामदास कदम, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव, गुलाबराव पाटील यांची निवड झाली आहे. तर उपनेतेपदी २६ जणांची नेमणूक करण्यात आली. अनिल बाबर, दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया, श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहाटा, चिमणराव पाटील, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक, संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत, सदा सरवणकर, राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

दुसऱ्या टप्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळेल या आशेवर असणाऱ्या संजय शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा डावललं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मागील महिन्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने आपली नाराजी संजय शिरसाट यांनी बोलून दाखवली होती.

 

अतुल सावेंच्या वडिलांसोबत मी काम केले. मी काम करताना अतुल सावे राजकारणात कधी येतील हे मला वाटलं नव्हते. परंतु ते मागुन आले, राज्यमंत्री झाले, कॅबिनेट मंत्रीही झाले, सगळंच झालं…अरे आमच्याकडेही पहाना जरा…आज काल सिनीयरीटी काही उरली आहे की नाही” असा सवाल शिरसाटांनी उपस्थित केला होता.