काँग्रेसने तांबेंचे आरोप फेटाळले; पुराव्यासह दिले प्रत्युत्तर

नागपुर, ४ फेब्रुवारी २०२३: आमदार सत्यजित तांबे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर अनेक गौप्यस्फोट केले आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्याला चुकीचे एबी फॉर्म दिले, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला आहे. त्याला काँग्रेसने प्रत्युत्तर देत, तांबे हे खोटे बोलत असून त्यांना योग्य एबी फॉर्म दिला होता असा दावा केला आहे.

यावर आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सत्यजित तांबे यांनी केलेला आरोप फेटाळून लावला आहे. सत्यजित तांबेंना दिलेला अर्ज योग्यच होता, असं अतुल लोंढे म्हणाले. पुरावा म्हणून त्यांनी व्हॉट्सअॅपवर झालेल्या चॅटींगचा एक स्क्रीनशॉट सादर केला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संबंधित आरोप फेटाळून लावले आहेत.

सत्यजित तांबेंच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले, “आरोप म्हणण्यापेक्षा त्यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे.स्पष्टीकरण देताना त्यांनी खोटे आरोप केले आहेत. हे अतिशय क्लेशदायक आहे. ते जिंकले सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण ज्या काही गोष्टी घडल्या त्या कशामुळे घडल्या? याचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही. त्यांनी आरोप केला की, अमरावती आणि नागपूरचे एबी फॉर्म दिले होते. पण त्यांना जे फॉर्म पाठवले होते, ते फॉर्म बाळासाहेब थोरात यांचे सहकारी सचिन गुंजाळ यांच्याद्वारे पाठवले होते. त्याचे स्क्रीनशॉटही त्यांना पाठवले होते, व्हॉट्सअॅपवर त्यांचा ‘ओके’ असा रिप्लाय आला आहे, हे कोरे एबी फॉर्म आहेत, याचे पुरावे आमच्याकडे आहेत.”

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप