मंत्रीपदावरून शिंदे गटातील दोन आमदारांमध्ये हाणामारी, भांडण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री नागपूर दौरा सोडून मुंबईत
मुंबई, ६ जुलै २०२३: राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते
आठ अजित पवारांसह त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांमधील अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे. मंत्रिमंडळाच्या प्रस्तावित विस्तारात स्थान मिळवण्याच्या मुद्द्यावरून आता शिंदे गटाच्या आमदारांतच चढाओढ सुरू असून त्या संघर्षातूनच मंगळवारी दोन आमदारांत हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. आमदारांतील लठ्ठालठ्ठीचे वृत्त समजताच नागपूर दौऱ्यावरअसलेले मुख्यमंत्री शिंदे तातडीने मुंबईत परतले आणि त्यांनी याआमदारांची समजून काढल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
शिवसेनेतील फुटीच्या प्रक्रियेत शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून सुरुवातीपासून सक्रिय असलेले मराठवाडा आणि रायगड जिल्ह्यातील हे दोन आमदार
मंत्रिपदासाठी कमालीचे आग्रही आहेत. मात्र, गेले वर्षभर रखडलेला विस्तार आणि अचानक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मंत्रिमंडळातील समावेश यांमुळे शिंदे गटातील आमदारांत अस्वस्थता असून तीच या दोन आमदारांतील बाचाबाचीतून उघड झाली. या आमदारांची समजून काढण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री उशिरापर्यंत वर्षा बंगल्यावरील बैठकीत सुरू होता.
मंत्रिमंडळात पहिल्याच टप्प्यात आपल्याला संधी मिळेल या आशेवर असलेल्या या आमदारांचा अजित पवार गटातील नऊ जणांच्या शपथविधीमुळे भ्रमनिरस झाला. संभाजी नगर तसेच रायगड जिल्ह्यातील दोघा आमदारांनी शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून बंडाची आघाडी संभाळली होती. या आमदारांना मंत्रीमंडळात स्थान नसले तरी राज्यातील काही महत्वाच्या प्रशासकीय नियुक्त्यांमध्ये त्यांच्या शब्दाला प्राधान्य मिळत असल्याची चर्चा आहे. उद्योग विभागाचा ताबा उदय सामंत यांनी घेण्यापूर्वी या विभागातील महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये मराठवाड्यातील एका आमदाराचे नाव होते.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लामणीवर पडलेला असताना शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली असताना शिंदे गटातील आमदारांवर अन्याय होणार आहे. भाजप सोबत येऊन चूक अशी भावना देखील शिंदे गटातील आमदारांची होत असताना आता थेट मारामारी करण्यापर्यंत प्रकरण केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गटातील आमदारांची समजत होण्यासाठी हात पाय धुवून मिळवण्या करायची नामवशी आलेली आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप