![](https://sarkarkhabar.com/wp-content/uploads/2023/06/Chitra-Vagh-Supriya-Sule.jpg)
महिलेच्या हत्याकांडावरून चित्रा वाघ सुप्रिया सुळे एकमेकांच्या विरोधात
मुंबई, ८ जून २०२३: आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केल्याची धक्कादायक बाब मुंबईत उघडकीस आली आहे. या व्यक्तीने तिचे केवळ तुकडेच केले नाही, तर हे तुकडे कुकरमध्ये शिजवून काही कुत्र्याला खाऊ घातल्याची संतापजनक बाबही समोर आली आहे. या घटनेवरुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असतात. त्यावरुन आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे.
या विषयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपचे नेत्या चित्रा वाघ यांच्यात समाजमाध्यमांवर जुंपली आहे. “या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे,” अशी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुळेंच्या टि्वटवर चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे.
.
सुप्रिया सुळे टि्वटमध्ये म्हणतात, “मुंबई येथील मीरा रोड परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन् पार्टनरची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवून व मिक्सरमध्ये बारीक करुन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना अतिशय भीषण, अमानुष आणि संतापजनक आहे. गुन्हेगारांना या राज्यात कायद्याचा धाक शिल्लक राहिलाच नाही अशी ही स्थिती आहे,”
त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे..
“महिलांवरील गुन्हे संतापजनक पद्धतीने वाढत आहेत. राज्याचे गृहमंत्र्यांनी (देवेंद्र फडणवीस) आपल्या खात्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकरणातील आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी तपासयंत्रणांनी प्रयत्न करावे,” अशी मागणी सुळेंनी केली होती. सुप्रिया सुळे यांनी टि्वट करताना सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर हॅडलला टॅगही केले आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप