मुख्यमंत्र्यांचे आवाहन; पोटनिवडणुका बिनविरोध करा
मुंबई, २६ जानेवारी २०२३ : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथशिंदे यांनी सर्व विरोधी पक्षांना केले आहे. राजकीय पदावर कार्यरत असलेल्या
व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या जागेची पोटनिवडणूक ही बिनविरोध करायची ही महाराष्ट्राची परंपरा असल्याने सर्व विरोधकांनी ही निवडणूक बिनविरोध करावी, असे एकनाथ शिंदे पुढे म्हणाले.
दरम्यान, पंढरपूर आणि कोल्हापूर पोटनिवडणुकांत महाराष्ट्राने संस्कृती पाहिली असल्याचा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांना मारला. कसबा विधानसभा मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने विधानसभेच्या रिक्त झालेल्या या जागांवर पोटनिवडणुका होणार
आहेत. ही निवडणूक बिनविरोध होणार की
निवडणूक होणार विविधयाबाबत सध्या पक्षांमध्ये खलबते सुरू आहेत. त्यासाठी शिंदे यांनी विरोधकांना ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विरोधकांनी आपापले उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, असे सांगताना पदावरील कार्यरत व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्या जागेची पोटनिवडणूक ही बिनविरोध करायची ही परंपरा आम्ही अंधेरी येथील पोटनिवडणुकीत दाखवून दिली आहे, त्यामुळे यावर सर्वांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या दोन विधानसभा मतदारसंघांत२६ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे, तर मतमोजणी २ मार्चला होईल.