चंद्रकांत पाटील यांनी विकला ५ हजार कुटुंबांना दिवाळी फराळ
पुणे, २० ऑक्टोबर २०२२: कोथरुडमधील प्रत्येकाची दिवाळी गोड व्हावी, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून नाममात्र दरात केवळ ₹१००/- प्रति किलो दराने तयार दिवाळी फराळ उपलब्ध करुन दिला. या उपक्रमाचा कोथरुडमधील ५ हजार कुटुंबांना याचा लाभ घेतला आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. कोथरुडकरांच्या उत्तम आरोग्यासाठी मोफत फिरता दवाखाना हा उपक्रम कार्यन्वित केला आहे. त्यासोबतच रिक्षाचालक, वृत्तपत्र वितरक, दूध वितरक, घरकाम करणाऱ्या ताई यांसाठी पावसाळ्यात रेनकोट वाटप, तर यंदा हिवाळ्यात स्वेटर वाटप राबविला आहे.
सर्व नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दरवर्ष पाटील यांच्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नाममात्र दरात दिवाळी फराळ उपलब्ध करुन देण्यात येतो. याला कोथरुडमधील नागरिकांकडून नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.
यंदाही १८ आणि १९ ऑक्टोंबर रोजी पाटील यांच्या कोथरुडमधील जनसंपर्क कार्यालयात व पाषाण बाणेर भागात तयार दिवाळी फराळ उपलब्ध करुन दिला होता. या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. जवळपास ५ हजार कुटुंबांनी याचा लाभ घेत, दिवाळी फराळ खरेदी केला.
या उपक्रमामुळे सर्वांनाच मोठा लाभ होत असून, सर्वांनी या उपक्रमाबद्दल पाटील यांचे आभार मानले.