राम मंदिराच्या लोकार्पणानंतर भाजप दंगली घडवणार – चंद्रकांत खैरे यांचे धक्कादायक वक्तव्य

नांदेड, २१ ऑगस्ट २०२३: गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली घडल्या आहेत. दरम्यान, औरंगाबादसह अहमदनगर, अमरावती आणि कोल्हापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. या सर्व घटनाक्रमानंतर आता राम मंदिराच्या लोकार्पणानंतर दंगली घडवल्या जातील, असं वक्तव्य महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. यावरून ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केला आहे.

भाजपाकडून महाराष्ट्रात दंगलीचं राजकारण केलं जात आहे. यापूर्वी राज्यात सात दंगली घडल्या, हे भाजपाचं कटकारस्थान होतं, असा आरोप खैरे यांनी केला. मुस्लीम आणि दलित बांधव उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या बाजुने येऊ नये म्हणून त्यांना भडकवण्याचं काम केलं जात आहे, असंही चंद्रकांत खैरे म्हणाले. ते नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, “भाजप हे महाराष्ट्रामध्ये दंगलीचं राजकारण करत आहे. यापूर्वी राज्यात सात दंगली घडल्या आहेत, हे भाजपाचं कटकारस्थान आहे. राज्यातील दलित आणि मुस्लीम बांधव उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या बाजुने येतायत. ते मविआच्या बाजुने येऊ नयेत म्हणून त्यांना भडकवण्याचं काम केलं जात आहे. हिंदूंना वेगळं भडकवायचं आणि मुस्लिमांना वेगळं भडकवून जातीय तणाव निर्माण करायचा आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, असं भाजपाचं कटकारस्थान आहे.”

दरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील नुकतेच भाजप राम मंदिरात lचे उद्घाटन झाल्यानंतर देशभरात दंगली घडवणार असल्याची माहिती असल्याचा दावा केला होता. त्यावरून भाजप नेत्यांच्यावर टीका करत असे दावे करण्याऐवजी त्याचे थेट पुरावे द्या अशी मागणी केलेली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून देखील काँग्रेस प्रमाणेच वक्तव्य करून भाजप घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप