येरवडा येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, 31 मे 2023: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मागासवर्गीय गुणवंत मुलांचे शासकीय वसतिगृह (नवीन) येरवडा, पुणे येथे 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुकांनी प्रवेश घेण्याचे आवाहन वसतिगृहाचे अधीक्षक यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी नंतर कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश अर्ज वसतिगृहात उपलब्ध आहेत. प्रवेश हा प्रवर्ग निहाय गुणवत्तेनुसार राहील. शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास, आंथरुण पांघरुण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी या शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य तसेच दरमहा निर्वाह भत्ता इत्यादी सुविधा पुरविण्यात येतात.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप