मंत्रीमंडळ विस्ताराला उद्याचा मुहूर्त : बारा मंत्री घेणार शपथ

पुणे, ८ आॅगस्ट २०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार अखेर उद्या (ता.९) दुपारी बारा वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्यापही या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या दुपारी बारा वाजता विधिमंडळामध्ये १२ मंत्र्यांचा शपथ दिली जाणार आहे.

१२ जणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून सहा आणि भाजपाकडून सहा अशा बाराजणांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांमध्ये धाकधूक आहे. अद्याप अधिकृतपणे कोणालाही फोन किंवा निरोप आलेला नाही. प्रत्येकजण आपल्याला फोन येऊ शकतो या आशेने फोनची वाट पाहत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून कोण शपथ घेणार ही नावे साधारणे स्पष्ट झाली आहेत. मात्र भाजपाकडून कोणतेही नाव कुणीही खात्रीने सांगत नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संदिपान भुमरे,अब्दुल सत्तार आणि शंभुराज देसाई यांचा शपथविधी होणार आहे. भाजपाकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे-पाटील, अतुल सावे, मनिषा चौधरी व माधुरी मिसाळ यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, यापैकी अधिकृतपणे कुणीही बोलायला तयार नाही.होत नसल्याने राज्यातून चौफेर टीका होत आहे. आमदारांच्या अपात्रतेचा विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आहे. यमुळे सरकारची अडचण झाली आहे. त्यामुळेच विस्तार होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या विस्तार नक्की होणार अशी चर्चा असली तरी याबाबतदेखील अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाची शपथ घेऊन तब्बल २७ दिवस झाले. अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार