भाजपचे मोठे टेंशन दूर – बोरीवलीतून शेट्टींची माघार
मुंबई, ४ नोव्हेंबर २०२४: भाजपाचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी ॉहे बोरीवलीतून अपक्ष लढवण्यार ठाम होते. मात्र आज अखेर त्यांनी माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. किरीट सोमय्या आणि विनोद तावडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर गोपाळ शेट्टींनी उमेदवारी मागे घेतली आहे. माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीवर होती. कार्यकर्त्यांची काळजी पक्ष घेतो. मला अनेक नेते भेटायला आले. गोपाळ शेट्टी यांना काय करायचं ते करु दे अशी भूमिका पक्षाने घेतली नाही. त्यामुळे मी माघार घेतो आहे असं गोपाळ शेट्टींनी जाहीर केलं.
बोरीवलीत भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्यानंतर गोपाळ शेट्टींनी बंड करत काहीही झालं तरीही निवडणूक लढणारच असं म्हटलं होतं. मात्र आज ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे त्या दिवशी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
शेट्टी म्हणाले,“होय मी माघार घेत आहे. मी आमदार बनण्यासाठी लढत नाही आहे. मला दुसऱ्या पक्षांकडून देखील ऑफर्स आल्या होत्या . मात्र मला तसं करायचं नव्हतं . माझी लढाई विशिष्ट कार्यपद्धतीसाठी होती. गोपाळ शेट्टी करतोय तर करु दे काय फरक पडतो? असं आमच्या पक्षात नाही . सर्व पक्षश्रेष्ठी मला भेटायला आले. माझं मत श्रेष्ठींपर्यंत बरोबर पोहचवण्यात मी यशस्वी ठरलो. बाहेरचा उमेदवार आणू नये असं मी मुळीच म्हणत नाही आहे . मात्र सातत्याने झाल्याने मला हे करावं लागलं. पक्ष व्यक्तीपेक्षा मोठा असतो . पक्षाकडे आपल्या भावना मांडल्या आहेत.” असं गोपाळ शेट्टी म्हणाले.