भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची शिवसृष्टीला भेट
पुणे, दि. २० सप्टेंबर, २०२३ : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, राष्ट्रीय संघटन महामंत्री बीएल संतोष यांनी नुकतीच पुण्यात झालेली समन्वय समितीची बैठक संपल्यानंतर आवर्जून पद्मविभूषण कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने न-हे – आंबेगाव येथे साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी’ला भेट दिली.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळ्, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांसोबतच शिवसृष्टीचे विश्वस्त जगदीश कदम, विनीत कुबेर, सुनील मुतालिक, संघाचे कार्यकर्ते मनोज पोचट, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
शिवसृष्टीचे पहिल्या टप्प्याचे पूर्ण झालेले काम पाहून जे पी नड्डा यांनी समाधान व्यक्त करीत दुसऱ्या टप्प्याच्या चालू कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. याबरोबरच पुढील वर्षी जून महिन्यामध्ये शिवराज्याभिषेकाच्या ३५० वर्ष सांगता समारंभाच्या प्रसंगी दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण व्हावे यासाठी केंद्र शासनाकडून व विविध राज्य सरकारांकडून मोलाचे आर्थिक सहाय्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे अलौकीक कार्य जगाला ज्ञात व्हावे यासाठी चार भाषांमध्ये माहिती ऐकण्याची सध्याची सोय अन्य जागतिक भाषांचा समावेश करीत आणखी विस्तारावी अशी अपेक्षा बीएल संतोष यांनी व्यक्त केली.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप