भाजप अन् सेनेचे आमदार ‘रेशीमबागेत’ : आगामी निवडणुकांसाठी संघाकडून पंचसुत्री
नागपूर, १९ डिसेंबर २०२३ : भाजप आणि शिवसेनेच्या बहुसंख्य नेत्यांनी आज (मंगळवारी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘रेशीमबाग’ येथील स्मृतीमंदिरात हजेरी लावली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांना अभिवादनही केले. यावेळी भाजपच्या आणि सेनेच्या आमदारांना संघाकडून आगामी निवडणुका आणि दोन वर्षांत होणारी संघाची शताब्दी या विषयांवर पाच मुद्द्यात कानमंत्र देण्यात आला.
नागपूर हिवाळी अधिवेशनकाळात दिवंगत केशव बळीराम हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी भाजपचे आमदार आणि खासदार संघ मुख्यालयात जातात. यंदा भाजप आमदार आशिष शेलार यांच्यावतीने शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदारांनाही निमंत्रण पाठविले होते. यानुसार दोन्ही पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी हजेरी लावली. मात्र आपल्या पूर्वनियोजत कार्यक्रमांमुळे आपण येऊ शकणार नसल्याचे अजितदादा आणि त्यांच्या गटातील आमदारांनी कालच कळविले होते.
संगाची अशी आहे पंचसुत्री आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता जातीगत विषमता राहू नये. संपूर्ण देश, संपूर्ण देशाची जनता ही समरसतेने रहावी. असा एक सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आला. दुसरा संदेश म्हणजे, आपल्या देशाची जी कुटुंब पद्धती जी जगामध्ये अतिशय कौतुकास्पद अशी आहे. पण ती कुटुंब पद्धती ऱ्हास होताना दिसत आहे. त्या भारतीय कुटुंब पद्धतीचा पुन्हा विकास व्हावा. तिसरा पर्यावरणाचा संतुलनाचा संदेश देश्यात आला. चौथा आत्मनिर्भर भारत व्हावा या दृष्टीने आपली काही कर्तव्य आहेत ते आपण केलं पाहिजे. स्वदेशी स्वतंत्र विकसित व्हावे. तर पाचवे म्हणजे आपण नागरी कर्तव्याचे पालन केले पाहिजे असे संदेश देण्यात आले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप