बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप – मलिक प्रकरणात फडणवीस पवारांमध्ये संगणमत
पुणे, ९ डिसेंबर २०२३: राष्ट्रवादीचे काँग्रेस नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर बसल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याबद्दल आक्षेप घेतला. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी “अजित दादा आणि फडणवीस कायम सोबत असतात. तर मग पत्र कशाला पाठवल. फडणवीस आणि अजित दादा हे संगनमताने करत आहेत असा गंभीर आरोप बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मलिक यांचा दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपावरून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक हे देशद्रोही आहेत असा आरोप भाजपने यापूर्वी केलेला आहे. तशी त्यांची भूमिका देखील ठाम आहे. मलिक यांना वैद्यकीय कारणासाठी जामीन मिळाल्यानंतर ते अजित पवार गटात जाणार की शरद पवार गटात जाणार यावरून तर कवितर्क लढवले जात होते. दरम्यान मलिक यांनी त्यांची भूमिका स्पष्ट न करता विधीमंडळ अधिवेशनात थेट ते विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या बाकावर जाऊन बसले. यास भाजपने आक्षेप घेतला आहे, अजित पवार गटाने देखील यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. अद्याप मलिक यांना बाजूला केलेले नाही. या गोंधळात विधिमंडळ अधिवेशनाचे दोन दिवस वाया गेलेले आहेत. त्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पुणे विमानतळावर पत्रकारांशी बोलताना गंभीर आरोप केला. “अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस हे कायम एकत्र असतात काय गरज पडली असा प्रश्न त्यांनी केला. कदाचित मलिक आणि प्रकरणात फडणवीस आणि अजित दादा हे दोघेही एकत्रच आहेत. संगनमताने हे सर्व घडवले असल्याचा गंभीर आरोप थोरात यांनी केला आहे.”
राज्य सरकारकडून
निधी वाटप मध्ये आमदार मध्ये भेद केला जात असेल तर ते दुर्दैवी आहे. विरोधी पक्षाच्या आमदारांवर अन्याय होत असतो पण अस अलीकडच्या काळात सारख होत आहे.” अशी टीकाही थोरात यांनी केली.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप