बच्चू कडू यांची लॉटरी; एकनाथ शिंदे यांनी दिले मंत्रीपदाचे गिफ्ट

मुंबई, २४ मे २०२३: ठाकरे सरकारमध्ये फुटून शिंदे गटामध्ये गेलेले प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांना राज्य सरकारने मंत्री पद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू हे शिंदे फडणवीस सरकारला नाराज होते. आम्ही तुमच्यासोबत आलो म्हणून बदनामी होत आहे. ५० खोक्यांचा आरोप होत आहे असा आरोप त्यांनी भर कार्यक्रमात केलेला होता
आमदार बच्चू कडूंना अखेर शिंदे सरकारनं मंत्रिपदाचा दर्जा दिलाय. दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडूंची निवड करण्यात आलीय. मात्र या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा देण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. गेल्या वीस वर्षांपासून बच्चू कडू दिव्यांगांसाठी लढा देत आहेत. तेव्हा दिव्यांग कल्याण खात्याचे अभियान दिव्यांगांपर्यंत पोहचवण्यासाठी बच्चू कडूंना मंत्रिपदाचा दर्जा दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

राज्यामध्ये शिवसेनेमध्ये बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे आमदारांसोबत बच्चू कडू हे देखील गुवाहाटीला गेले होते. राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर गेल्या आठ नऊ महिन्यापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. त्यामध्ये बच्चू कडू यांना स्थान देण्यात आलेले नाही व नवीन मंत्री पद कधी मिळेल याचीही काही शाश्वती नव्हती. त्यामुळे कडू हे वारंवार सरकारच्या विरोधात वक्तव्य करून दबाव निर्माण करत होते. सर्वोच्च न्यायालयात शिंदे फडणवीस सरकारला अभय मिळाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापूर्वीच बच्चू कडू यांना राज्य सरकारने बढतीचे गिफ्ट दिलेले आहे.
अपंगांसाठी काम करणाऱ्या बच्चू कडू यांना दिव्यांग कल्याण विभागाचा अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. या मंडळाला विशेष मंत्री पदाचा दर्जा देऊन कॅबिनेट मंत्री पदाच्या सर्व सुविधा आणि अधिकार बच्चू कडू यांना यातून मिळालेले आहेत. त्यामुळे आता शिंदे गटातील व भाजपमधील आमदारांच्या ही अशा पल्लवीत झालेल्या आहेत.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप