नवणीत राणा, यशोमती ठाकूर यांच्या वादात बच्चू कडू यांची उडी

अमरावती, १५ सप्टेंबर २०२३: एकमेंकावर सुरू असलेल्या आरोपांमुळे सध्या अमरावतीचे राजकारण जोरदार पेटले आहे. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. त्यात आता आमदार बच्चू कडू यांनी उडी घेतली आहे. यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत पैसे घेतले असेल तर याबाबत निवडणूक आयोग, पोलिसांनी कारवाई करावी. असे असेल तर आपल्या जवळच्या असलेल्या राणा दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का अभय देत आहे, असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे कडू यांच्याकडून एकाच वेळी दोघींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमरावतीमध्ये झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेसच्या नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर एक गंभीर आरोप केला आहे. लोकसभा निवडणुकीत रवी राणा यांच्याकडून यशोमती ठाकूर यांनी कडक नोटा घेतल्या. परंतु काम दुसऱ्याचे केल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित होते. यशोमती ठाकूर यांनीही याबाबत शंभर कोटींचा अब्रुनुकसानीची दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. राणा यांनी पैसे वाटले असेल तर ईडी काय करत होती. उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रवी राणांना पाठिंबा होता, असा सवालही यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

या वादावर बच्चू कडू म्हणाले, खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे खालच्या स्तरावर जाऊन आरोप करत आहे. अमरावती जिल्ह्याची परंपरा फार चांगली राहिली आहे. ही परंपरा चांगली ठेवण्याचे काम आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींचे आहे. पण गेल्या काही दिवसांपासून उठ सूट सगळ्यांना टार्गेट करण्याचे काम राणा दांपत्याकडून सुरू आहे.

नवनीत राणा या यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे घेतल्याच्या आरोप करत असेल तर निवडणूक आयोग व पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. मी स्वतः अमरावती पोलिस आयुक्तांकडे याची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. राणा दाम्पत्य हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. राणा दाम्पत्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभय आहे का, त्यांच्यावर फडणवीसांनी आवार घालावा, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप