औरंगजेबाचा उदो उदो होऊ शकत नाही – देवेंद्र फडणवीसांनी आंदोलकांना ठणकावले
अहमदनगर, १२ मार्च २०२३: ‘औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यासंबंधी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यावर आता आक्षेप घेणे योग्य नाही. काहीही झाले तरी आपल्या देशात छत्रपती संभाजी महाराजांचाच उदोउदो केला जाईल औरंगजेबाचा कदापि नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता व सुव्यस्था कायम राखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना ठणकावले.
पारनेर तालुक्यातील कार्यक्रमानंतर फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोल होते. नामांतराच्या विरोधात छत्रपती
संभाजीनगरमध्ये ‘एमआयएम’चे आंदोलन सुरू असल्याबद्दल विचारल असता फडणवीस यांनी हे उत्तर दिले.
‘सुपा एमआयडीसीमध्ये कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,’
असा इशाराही त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा ‘ईडी’चा छापा पडल्यासंबंधी
आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अनेक दिवसांनंतर प्रत्यक्ष भेटून आनंद झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट होणार असल्याने मी येथे आलो. हजारे यांच्या विचारांतील ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्यात येणार आहे. यातून धरणांतील गाळ काढला जाऊन पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाळ शिवारात आल्याने उत्पादनवाढीस मदत होईल. यातून गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
ती कामे आमच्याच सरकारची’
कर्जत तालुक्यात फडणवीस यांच्या उपस्थितीत शेतकरी
1 मेळावा आणि विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात
आले. खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि आमदार राम शिंदे यांच्या पुढाकारातून झालेल्या या कार्यक्रमात काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण घुले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमापूर्वी शहरात या कामांसंबंधी श्रेयवाद
रंगला होता. यावर फडणवीस म्हणाले, ‘ही कामे आमच्या मागील सरकारच्या काळात सुरू झाली होती. महाविकास आघाडीच्या काळात ती बंद पडली. आता ती पूर्ण झाली आहेत.’