‘एमआयएम’च्या नामांतरविरोधी आंदोलनात औरंगजेबाचे छायाचित्र झळकले
छत्रपती संभाजीनगर, ५ मार्च २०२३ : औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्या निषेधार्थ ‘एमआयएम’ने शनिवारी केलेल्या आंदोलन सुरू केल्याने राजकीय वातावरण तापलेले असताना या आंदोलना त थेट औरंगजेबाचे चित्र काही तरुणांनी जळकावले त्यामुळे आता या आंदोलनाला विरोधाची धार तीव्र झालेली आहे. दरम्टान खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र नामांतरविरोधातील लढ्याला बदनाम करण्यासाठीच औरंगजेबाचे छायाचित्र आंदोलनस्थळी आणल्याचे स्पष्टीकरण दिले.
नामांतर संघर्ष समितीच्या वतीने शनिवारपासून साखळी आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात मोठय़ा संख्येने तरुण सहभागी झाले होते. ‘आय लव्ह आौरंगाबाद’ असे फलक या आंदोलक तरुणांच्या हातात झळकत होते. मात्र, दुपारी अचानक काही तरुण आंदोलनस्थळी आले आणि त्यांनी औरंगजेबाचे छायाचित्र झळकवले. दरम्यान या घटनेची कुणकुण खासदार जलील यांना लागल्यानंतर आणि त्यावरून वाद उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी तातडीने स्पष्टीकरण देण्यासाठी भूमिका मांडली. औरंगाबादच्या नामांतराला उद्योग, सर्वसामान्य जनतेतून विरोध होत असून आपल्या आंदोलनाला बदनाम करण्याच्या उद्देशानेच काही तरुणांनी येथे औरंगजेबाचे छायाचित्र येथे प्रदर्शित केले. या घटनेशी एमआयएमचा कसलाही संबंध नसल्याचा खुलासा जलील यांनी केला.
आंदोलनादरम्यान, माजी नगरसेवक ढगे व इतर पदाधिकारी नामांतरविरोधातील अर्ज भरून घेत होते. वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागाचे सचिव तैय्यब जफर यांनी नामांतराबाबतची भूमिका स्पष्ट केली. वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ, असे नाव कायम असेल तोपर्यंत आम्हीही शहराला औरंगाबाद म्हणू, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार जलील यांच्या नेतृत्वाखालील नामांतर विरोधातील आंदोलनाला पाठिंबा असल्याचे तैय्यब जफर यांनी जाहीर केले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप