सीमाप्रश्नावर महाराष्ट्राने समिती स्थापन करताच कर्नाटकनेही दिले आव्हान
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२२: गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र-कर्नाटकचा सीमा वाद सुरू आहे. दोन्ही राज्यात कायदेशीर लढाई सुरू असताना महाराष्ट्र सरकारने यामध्ये समन्वय रहावा यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी आम्हीही तयार आहोत असे आव्हान दिले आहे. दरम्यान यामुळे दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असल्याने त्यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे .
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर कर्नाटक सरकार कायदेशीर लढाई लढण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. याच प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 14 सर्व पक्षीय नेत्यांची बेठक घेतली. त्यानंतर या प्रश्नावर न्यायालयात बाजू मांडण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती केली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर दोन्ही राज्यांकडून बैठका आहेत. याविषयावर बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्ष सीमावादाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सीमावादाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.