पुणेश्वरसाठी तारीख जाहीर करू इतिहास घडविण्यासाठी तयार व्हा – नितेश राणे

पुणे, ४ सप्टेंबर २०२३: पुणेश्वर मंदिर येथील अतिक्रमण पाडा, आता पुन्हा आयुक्तांना लव्हलेटर पाठवणार नाही. फक्त तारीख जाहीर करू, मग इतिहास घडविण्यासाठी तयार व्हायचे. पुण्येश्वरला भगवा लावून घरी जायचे, असे प्रक्षोभक वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले.
पुण्येश्ववर पुनर्निर्माण समितीतर्फे
कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर येथे धार्मिक अतिक्रमण पाडून टाकण्याच्या मागणीसाठी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी राणे बोलत होते.

नितीश राणे म्हणाले, अतिक्रमणाची आम्ही वीट काढणार नाही. पण तुम्ही काढली नाही तर महापालिका आयुक्तांना आता पुन्हा लवलेटर पाठवणार नाही फक्त तारीख जाहीर करू. मग इतिहास घडविण्यासाठी तयार व्हायचे. पुण्येश्वरला भगवा लावून घरी जायचे.
महाराजांनी औरंगजेबाकडून मंदिर वाचवले, आता मावळे मंदिर वाचवले.
हिंदू म्हणून भिती निर्माण करा की कोणी वाकडी नजर टाकली तर दोन पायावर तो घरी जाणार नाही. माझ्यावर प्रक्षोभक भाषणाचा गुन्हा दाखल झाला तरी चालेल, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे चिंता नाही, असे ही राणे म्हणाले.

महेश लांडगे म्हणाले, धर्मीक स्थळ पाडापाडीसाठी आयुक्त विक्रम कुमारांना ४८ तासाचा अल्टीमेटम दिला आहे. तुम्ही पाडा नाही तर आम्ही हे अतिक्रमण पाडू शकतो. कायदा हातात घ्यायला लाऊ नका, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर तुम्ही जबाबदार राहाल.