संतापलेली महिलेने बावनकुळेंना झापले – महागाई वाढवता आम्ही माती खायची का ?

वर्धा, २ नोव्हेंबर २०२३: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे सध्या संकल्प ते समर्थन यात्रेत राज्यभरात फिरत आहेत. या यात्रेत नागरिकांशी संवाद साधत २०२४ मध्ये पंतप्रधान कोण?, असा प्रश्न ते विचारतातच. मात्र हाच प्रश्न त्यांना आता अडचणीचा ठरू लागला आहे. अनेक ठिकाणी त्यांची फजिती होत आहे. आताही असाच प्रकार वर्धा शहरात घडला. बावनकुळे यांची फजिती कशी झाली याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने फिरत आहे. बावनकुळे यांची चांगलीच फजिती झाल्याचे दिसत आहे.

वर्धा शहरात भाजपकडून संकल्प ते समर्थन अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात बावनकुळे नागरिकांशी संवाद साधत होते. वर्दळीच्या परिसरातील साई मंदिर ते अंबिका चौकापर्यंत यात्रेदरम्यान त्यांनी एका महिलेला २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे? असा प्रश्न विचारला. यावर मात्र ती महिला चांगलीच संतापली. सरकार विजेचे बिल वाढवून देते. सिलिंडर वाढवून देते. आम्हाला काम धंदे नाही, माती खायची का? असा सवाल या महिलेने विचारला. त्यावर मात्र बावनकुळेंची चांगलीच पंचाईत झाली. त्यांनी माईक बाजूला करत महिलेचे बोलणे थांबवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही स्टेजवर चला, आपण स्टेजवर बोलू, असे त्यांनी महिलेला सांगितले. मात्र त्यावर महिला आणखीच संतापली. स्टेजवर बोलायचे मग लोकांना रस्त्यावर का विचारता, अशीच चर्चा महिलांमध्ये सुरू होती.

या अभियानांतर्गत बावनकुळे राज्यभरात फिरत आहेत. नागरिकांशी संवाद साधत आहेत. वर्धा शहरात घडलेल्या प्रसंगाने मात्र त्यांची चांगलीच फजिती झाली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बावनकुळे यांच्या यात्रेदरम्यान त्यांना काही ठिकाणी अशा पद्धतीने लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप