अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ते पुढे नेतील : चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, 06 फेब्रुवारी 2024: निवडणूक आयोगाने अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचे निर्णय दिल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे घेऊन जातील, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, मी अजित दादा पवारांचं अभिनंदन करतो की त्यांना निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून घड्याळ हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय दिला. जेव्हा निवडणूक आयोगाचा निकाल येतो तेव्हा तो नियमाप्रमाणे व संविधानाप्रमाणे ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी आणि मतदारांचा कौल आहे. त्यांच्याकडे तो निकाल साधारणतः दिसतो. अजितदादा नक्कीच राष्ट्रवादीचे नेते म्हणून राष्ट्रवादी पक्ष म्हणून पुढे घेऊन जातील. विरोधकांचे काम विरोधात बोललेच आहे म्हणून त्यांचे नावच विरोधक आहे विरोधक आमच्या बाजूने कसे बोलतील, असा टोला लगावत निवडणूक आयोगावर टीका टिपणी करणे योग्य नाही, असे सांगितले. निवडणूक आयोग कधीच बायस निर्णय देत नाही कुणाच्याही बाजूने निर्णय देताना निवडणूक आयोग खूप दाखले देतो. त्यामुळे आयोगाच्या निकालाला सर्वांनी स्वीकारले पाहिजे असेही ते म्हणाले.