अजित पवारांनी इच्छा व्यक्त करतात रावसाहेब दानवे यांनी दिली मुख्यमंत्री पदाची ऑफर
जालना, २१ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मला आत्ता देखील मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे वक्तव्य पुण्यामध्ये एका मुलाखतीत केले. त्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अजित पवार जर बहुमताच्या बाजूने आले तर ते लगेच मुख्यमंत्री होऊ शकतात असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे अजित पवार यांच्या बंडाचा विषय थांबण्यास तयार नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. राष्ट्रवादीतील ४० आमदारांसह अजित पवार भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चेला अजित पवार यांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे. जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करेन, असं विधान अजित पवारांनी केलं.
सत्तांतराच्या चर्चेवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी ते मुख्यमंत्री पदावरून पुन्हा एकदा चर्चत आले आहेत. अजित पवारांनी नुकतंच ‘सकाळ’ वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला शंभर टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, अशी प्रबळ इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली.
अजित पवारांच्या या विधानानंतर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सूचक विधान केलं
आहे.
ते जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दानवेे म्हणाले, अजित पवार बहुमताच्या बाजुने आले तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात,
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप