सुप्रिया सुळे नंतर अजित दादा थोडक्यात बचावले, चौथ्या मजल्यावरून आपटली
बारामती, १५ जानेवारी २०२३ : खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची घटना आज सकाळी घडलेली असताना पवार कुटुंबियांसोबतची दुसरी धक्कादायक पुढे आली आहे. शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार हे एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी गेलेले असताना चौथ्या मजल्यावर लिफ्ट खाली आदळली. “थोडक्यात वाचलो नाहीतर आज तुम्हाला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र यायला लागले असते” असे अजित पवार यांनी खुद्द भर काय काम सांगितले पवार यांनी विनोदात ही गंभीर घटना सर्वांपुढे आणली.
“काल १४ तारखेच्या या घटनेबाबत मी कुठे बोललो नव्हतो, पण तुम्ही घरचे आहात म्हणून तुम्हाला सांगतो. काल एका हॉस्पिटलचं उद्घाटन केलं. चौथ्या मजल्यावर लिफ्ट घेऊन मी आणि डॉ. हार्डिकर, त्यांचं वय ९० आहे, त्यांना घेऊन लिफ्टमध्ये गेलो. लिफ्ट काही वर जाईना. तिथेच बंद झाली. यानंतर लाईट गेली. इतक्यात लिफ्ट धाडकन खाली कोसळली. खोटं नाही सांगत आज माझ्या श्रद्धाजलीचा कार्यक्रम झाला असता,” असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, “पुण्यात एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेलो असता डॉ. हर्डीकर, सिक्युरिटी गार्ड व मी स्वतः लिफ्टमध्ये अडकलो आणि काही क्षणातच ती लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. बारामतीकरांनो शनिवार (ता.14) रोजी घडलेला प्रसंग पत्नी सुनेत्राला आणि आईला सुद्धा सांगितलं नाही, ही दुर्घटना एवढी गंभीर होती की, मी केवळ तुमच्या सर्व बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आशीर्वादामुळे वाचलो आहे, अन्यथा आज माझी श्रद्धांजलीच व्हायलाच तुम्ही आला असता,” अशा शब्दात खुद्द अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात घडलेल्या अपघाताची माहिती स्पष्ट केली.
हा अपघाताचा प्रसंग ऐकताना बारामती तालुक्यातील पणदरे पवईमाळकरांच्या अंगावरती शहारे उभे राहिले होते. दादा तुम्हाला शंभर वर्षे आयुष्य आहे, असे माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप सभेत बोलले असता , “अरे योगेश तुझ्या आशीर्वादामुळेच मी वाचलो ” अशा शब्दात पवार यांनी निर्माण झालेले सभेतील गंभीर वातावरण हलकेफुलके करण्याचा प्रयत्न केला.