आचारसंहिता पथकाची चिंचवड विधानसभा मतदारसंघात कारवाई

पुणे, 17 फेब्रुवारी 2023: चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूकीची आदर्श आचारसंहिता सुरू आचारसंहिता कक्षाकडून सार्वजनिक जागेवरील २७५ पोस्टर, १७४ बॅनर्स, ३ हजार ७२४ झेंडे व फलकांसंदर्भात कारवाई करण्यात आली आहे.

आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी विविध पथकांमार्फत प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. निवडणुकीसंबंधी कोणत्याही आर्थिक गैरव्यवहारांची बाब निदर्शनास आल्यास त्यावर कारवाई करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सर्व पथक प्रमुखांना दिले आहेत.

उमेदवारांच्या सुविधेसाठी कार्यालयात एक खिडकी कक्षाची स्थापना केली आहे. विविध पक्षाचे तसेच अपक्ष उमेदवार यांनी केलेल्या मागणीनुसार या कार्यालयामार्फत १६ फेब्रुवारी पर्यंत ९ सभांना परवाने देण्यात आले आहेत. तर १८ रॅली व मिरवणुका, ९५ वाहन परवाने, ११ तात्पुरते पक्ष कार्यालय परवाने आणि ३३ जाहिरात फलक परवाने देण्यात आले आहेत. सी-व्हीजील ॲपवर एकूण १२ तक्रारी प्राप्त झाल्या असून तक्रार निवारण कक्षाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप