चिंचवडमध्ये “आप”च्या उमेदवाराचा अर्ज बाद
पिंपरी, ७ फेब्रुवारी २०२३ : चिंचवड विधानसभा मतदारसंघात “आप”ला मोठा धक्का बसला. उमेदवारांच्या अर्ज छाननीमध्ये
आपचे अधिकृत उमेदवार मनोहर पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे.
चिंचवड विधानसभा पोट निवडणूकीसाठी ४० उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. भाजप, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, आपसह इतर पक्ष व पक्षांचा समावेश आहे. आज सकाळी 11 वाजता उमेदवारांच्या अर्जांची छाननी सुरू केली त्यामध्ये आपचे उमेदवार मनोहर पाटील यांनी अर्जावर सूचक अनुमोदक न दिल्याने अर्ज अवैध ठरला गेला. त्यामुळे शहरातील पक्षाच्या पहिल्याच निवडणुकीत “आप”च्या महत्वकांक्षेवर झाडू फिरला.
आपचे निवडणूक निरीक्षक हरिभाऊ राठोड संपर्काबाहेर
निवडणुकी आधीच आप पक्षाच्या झालेल्या नाचक्की ची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. चिंचवड विधानसभेमध्ये आप कुणाला पाठिंबा देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
याबाबत पक्षाचे पिंपरी चिंचवड निरीक्षक व प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ राठाड यांच्याशी संपर्क साधला असता ते संपर्का बाहेर आहेत.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप