अहमदनगरच्या महापालिका आयुक्तांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल, बांधकाम व्यवसायकाकडे मागितले आठ लाख रुपये

अहमदनगर, २७ जून २०२४ : बांधकाम परवानगी देण्यासाठी बांधकाम व्यवसाय काकडे आठ लाख रुपयांची लाच मागण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अहमदनगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे यांच्यासह लिपिक श्रीधर देशपांडे या दोघांवर अहमदनगर येथे तोपखाना पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलेला आहे. थेट महापालिका आयुक्ताविरोधातच लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्याने प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

४१ वर्षीय तक्रारदार हे मूळचे जालना येथील असून, त्यांनी अहमदनगर येथील नालेगाव येथेे २२६० चौरस मीटरचे बांधकाम करण्यासाठी अहमदनगर महापालिकेत बांधकाम परवानगीचा ऑनलाईन अर्ज केलेला होता.

मार्च 2024 मध्ये तक्रार बांधकाम परवानगी चा अर्ज दाखल करून देखील तो महापालिकेकडून मंजूर केला जात नव्हता त्यामुळे तक्रारदार आहे त्याचा पाठपुरावा करत होते त्यावेळी त्यांना आयुक्त पंकज जावळे येणे श्रीधर देशपांडे यांच्या माध्यमातून नऊ लाख तीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली मात्र तक्रारदाराची हे पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या विरोधात 19 जून रोजी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार केली लाच लुचपत विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता देशपांडे हे जावळे यांच्यासाठी आठ लाख रुपये मागत असल्याचे त्यात निष्पन्न झाले. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त जाळवडे यांच्यावर लाच मागण्यास प्रोत्साहन दिल्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

डॉ. पंकज जावळे (वय 47 वर्षे मूळ रा.माजलगाव जि.बीड सध्या राहणार – शासकीय निवासस्थान ,अहमदनगर, श्रीधर देशपांडे (वय 48) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे, पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी ही कारवाई केली.
या पथकात पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर यांचा सहभाग होता.