सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांची गळाभेट;राजकीय चर्चेला उधाण
बारामती, ८ मार्च २०२४: पवार घराण्यामध्ये फोटो पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवला जाणार असल्याने या मतदारसंघातील वातावरण चांगलेच आपले आहे. पवार कुटुंबातला वाद विकोपाला गेल्याने ही स्थिती निर्माण झालेली असताना आज महाशिवरात्री निमित्त मात्र एक वेगळाच अनुभव पाहण्यास मिळाला. काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी सुप्रिया सुळे गेले असता त्याच वेळेस तिथे सुनेत्रा पवार ही उपस्थित होत्या. या नंदा भाऊजई एकमेकांच्या समोर येताच त्यांनी गळाभेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेत जुलै महिन्यात बंडखोरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली यामध्ये ४० आमदार अजित पवार यांच्यासोबत आलेले आहेत. त्यानंतर अजित पवार हे राज्यात महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देखील झाले आहेत. अजित पवार यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली, शिवाय शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्यांना अजित पवारांनी सोडून दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात नैतिकतेची चर्चा सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असताना जागा वाटपासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. अजित पवार यांना बारामतीची जागा देण्यात आली असून, सुप्रिया सुळे यांचा काही करून पराभव केला पाहिजे याची जबाबदारी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अजित पवार यांच्यावर सोपवलेली आहे. ही जबाबदारी त्यांनी पार पाडल्यास त्यांना महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री म्हणून देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार ‘काहीही करा पण सुप्रियाला निवडणुकीत पाडा’ या इर्षाला भेटलेले आहेत. तर त्याच वेळेस आपल्या मुलीच्या विजयासाठी शरद पवार हे देखील पेटून उठले असून ते सभा बैठका घेत आहेत शिवाय कडक भाषा वापरून अजित पवार यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या देखील ही वाक् युद्ध चालू आहे. सुप्रिया सुळेंनी ‘मी नवऱ्याची जिवावर काम करत नाही, तर स्वतः काम करते’ असा टोला सुनेत्रा पवार यांना लगावला आहे. तर सुनेत्रा पवार यांनी ‘फक्त संसदेत भाषण देऊन काही होत नाही तर, प्रत्यक्षात काम करणे गरजेचे आहे, त्यासाठी मला निवडून द्या’ असे लोकांना आवाहन केलेले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ही चर्चा पेटलेली असताना आज महाशिवरात्रीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी बारामती मतदारसंघातील विविध मंदिरांमध्ये भेट दिली. त्याचवेळी त्या बारामती तालुक्यातील मंदिरात दर्शनासाठी गेलेले असताना तेथे सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. या दोघी एकमेकांच्या समोर येतात एकमेकांना टाळता गळा भेट घेऊन महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर या दोघी तिथून निघून गेल्या पण पवार घराण्यातील वाद विकोपाला गेलेला असताना या दोघींनी गळाभेट घेतल्यामुळे काही प्रमाणात वातावरण हलकेफुलके झालेले आहे. तसेच या निमित्ताने कार्यकर्त्यांनी देखील टोकाची भूमिकी न घेता तेवढा पुरता विरोध ठेवून एकमेकांशी संवादाने व चांगले राहिले पाहिजे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली आहे.