मी मंत्र्याची बायको, भगवानगडावर दसरा मेळावा घेणार
पुणे, १२ सप्टेंबर २०२२: दसरा मेळावा भगवानगडावर घेणार आहे, कारण मी वंजारी समाजाची सून असून मुंडे परिवाराची सून आहे. एकशे दहा टक्के मी आता दसरा मेळाव्याच्या रेसमध्ये उतरली आहे. यासाठी मी स्वतः नामदेव शास्त्री यांच्याकडे जाऊन जाणार चर्चा करेल. मी एका माजी मंत्राची बायको असून संघर्ष करत इथपर्यंत पोहोचली आहे, अशा शब्दात धनंजय मुंडे यांच्याशी पत्नीचे संबंध जोडणार्या करुणा मुंडे यांनी आव्हान दिले आहे.
मुंबईत शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे दसरा मेळावा घेणार की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरून वाद सुरू आहे. त्यात आता करुणा मुंडे यांनी उडी घेतली आहे.
करूणा मुंडे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.
मुंडे म्हणाल्या, “सगळेजण आपल्या आपल्या पद्धतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करत आहेत. मी महाराष्ट्राची अशी राणी रागिणी आहे की माझं नाव घेताच लोक घाबरतात. यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सलाम करते की त्यांनी माझ्यासारख्या रणरागिणीला भूमिका मांडण्यासाठी मला संधी दिली.
दसरा मेळावा हा शिवाजी पार्क आणि भगवानगडावर होतो हे माहिती होतं. मात्र, त्याच्याशिवाय कुठेच होत नाही हे मात्र माहिती नव्हतं. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनात आता मी पण रेस मध्ये उतरली आहे.
मी एका माजी मंत्र्याची बायको आहे, त्यामुळे मी माझी भूमिका मांडण्यासाठी मुंडे कुटुंबाची सून म्हणून भगवानगडावर मेळावा घेणार आहे. यासाठी नामदेवशास्त्री यांच्याशी चर्चा करेन, असे करुणा मुंडे यांनी सांगितले.