राऊत, आव्हाड, ठाकरे घटनातज्ञच; राहुल नार्वेकरांनी पदवीच देऊन टाकली
मुंबई, १५ फेब्रुवारी २०२४: संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे घटनाज्ञच, असल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच पदवीच देऊन टाकली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नूकताच निकाल दिला आहे. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचीच असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच दोन्ही गटाचे आमदार नार्वेकरांनी पात्र ठरवले आहेत. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नार्वेकरांनाचं टार्गेट केलं. त्यावर बोलताना नार्वेकरांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल नार्वेकर म्हणाले, राष्ट्रवादीच्या अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल हा कायदा, संविधानाच्या चौकटीत राहुनच देण्यात आला आहे. अपात्र आमदार प्रकरणाचा हा निकाल सुस्पष्ट असून निकालातील निर्णयाचं प्रत्येक कारण स्पष्ट करण्यात आलं आहे. हा निर्णय क्लिअर देण्यात आला असून असैंविधानिक पद्धतीने कोणताही निर्णय घेतलेला नाही. प्रत्येक निर्णयाचं कारण देण्यात आलं आहे. जितेंद्र आव्हाड, संजय राऊत, आदित्य ठाकरे घटनातज्ञच असून अशा विद्वानांच्या टीप्पणीवर उत्तर देण्यासाठी मी कमी पडत आहे, त्यांच्या टिप्पणीवर मला उत्तर द्यायंच नाही, असा खोचक टोला राहुल नार्वेकरांनी लगावला आहे.
तसेच ज्या लोकांना दहाव्या परिशिष्टाबद्दल माहित नाही. ते फक्त अशीच टिप्पणी करु शकतात. अशा लोकांना डिसेंट, डिफेक्शन कशाला म्हणतात हे त्यांनी सांगावं या गोष्टींवर मला बोलायंच नाही. सर्वोच्च न्यायालयाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. दहाव्या परिशिष्टाचा पूर्ण वापर करण्यात आला आहे. ज्यांना दहावे परिशिष्ट समजत नाही. त्यांनी यावर वक्तव्य करणं त्यावर मी उत्तर देणं योग्य वाटत नसल्याचंही राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा, हे जर शिकायचं असेल तर ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिकवणी वर्ग घेऊ शकतात. एकिकडे निवडणूक आयोगाने म्हटले की, पक्षामध्ये २०१९ पासून वाद सुरू झाले. तर राहुल नार्वेकर म्हणतात २९ जून २०२३ पर्यंत वाद नव्हतेच. शरद पवारच नेते होते. ३० जून २०२३ पासून वाद निर्माण झाले. दोन्ही गटाकडून अध्यक्षपदाला आव्हान दिल्यामुळे मी पक्षसंघटनेवर भाष्य करू शकत नाही, असे ते म्हणाले. पण १ सप्टेंबर २०२२ रोजी शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. तेव्हापासून ३० जून २०२३ पर्यंत त्यांच्या अध्यक्षपदाला आव्हानच दिले गेलेले नाही. तर वाद उरतोच कुठे? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.