शिंदे गटाचे आमदार सुरक्षित भाजपने घेतली महत्त्वाची भूमिका
पुणे, ७ सप्टेंबर २०२२: आगामी विधानसभा निवडणुका assembly election भाजप BJP आणि शिंदे गट एकत्र मिळून लढणार आहेत. पण याचा निवडणुका लढताना जागा वाटपावरून वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शिंदे गटाच्या Eknath Shinde Group आमदारांच्या जागेवर भाजप उमेदवार उभे करेल त्यामुळे या दोन्ही गटात अस्वस्थता होती. मात्र त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र Devendra fadnavis फडणवीस यांनी स्पष्टपणे आम्ही शिंदे गटाच्या जागांवर दावा दाखल करणार नाही असे सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या सोबत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील ओरिजनल शिवसेना Shivsena आहे. त्याच्यात जे जे लोक आलेले आहेत त्यांच्या कोणाच्याही जागेवर आम्ही कशाला दावा करू ? जर उरलेली शिल्लक सेना जी आहे, त्यांच्या जागे संदर्भात कोण निवडणूक लढवणार याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आम्ही घेऊ.
गेल्या काही दिवसांपासून बारामती Baramati लोकसभा मतदारसंघाचा विषय चांगला चर्चेत आहे भाजपच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन Nirmala sitaraman या तीन दिवसाच्या मुक्कामी येणार आहेत तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bavankule हे सध्या बारामती मतदारसंघात तळ ठोकून आहेत त्यावरून राष्ट्रवादी NCP कडून भाजपवर प्रचंड टीका केली जात असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले , २०२४ साठी आमचे मिशन महाराष्ट्र चालले आहे, मिशन इंडिया Mission India चालले आहे. बारामती हे महाराष्ट्रामध्येच येते ते महाराष्ट्राबाहेर नाही त्यामुळे मिशन महाराष्ट्र अंतर्गत बारामती आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात कार्यक्रम घेणे, बैठका घेणे, मेळावे आयोजित केले जात आहेत.