मुंबईत गेल्यानंतर सावध राहा – मनोज जरंगे पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

लोणावळा, २५ जानेवारी २०२४: मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेली पदयात्रा आज सकाळी लोणावळा शहरांमध्ये पोहोचली. या ठिकाणी जरांगे पाटील यांनी सहभाग घेत मुंबईत गेल्यानंतर त्यांच्यासोबत कोणताही दगाफटका होऊ नये हिंसा होऊ नये यासाठी आंदोलकांना मार्गदर्शन केले. अखंड सावध रहा कोणाच्याही दबावाला आणि अफवांना बळी पडू नका असे आवाहन पाटील यांनी त्यांच्या भाषणातून केले.

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढलेली आहे. आज या पदयात्रेचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, काल चौथ्या दिवशी पाटील हे पुण्यात होते. वाघोली येथून त्यांची पदयात्रा सुरू झाली तर त्यांना लोणावळ्यांमध्ये पोहोचण्यासाठी तब्बल २४ तास लागले चौकाचौकांमध्ये त्यांचे मराठा समाजातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज सकाळी सातच्या सुमारास जरांगे पाटील हे लोणावळ्यामध्ये पोहोचले दरम्यान हा मोर्चा मुंबईमध्ये येऊ नये यासाठी शासनाकडून शिष्टमंडळ पाठवून वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण जरांगे पाटील यांच्या मागणी अद्याप मान्य न झाल्यामुळे ही पदयात्रा मुंबईच्या दिशेने जात आहे.

लोणावळ्यामध्ये जरांगे पाटील म्हणाले, आपण आता मुंबईत जाणार आहोत तर प्रत्येक मराठा आंदोलनाकाने स्वयंसेवकाच्या भूमिकांमध्ये यावे. आपली कामे आपण करावीत आजार मैदानामध्ये आंदोलन बसल्यानंतर काहीही करायचे नाही सर्वांनी शांततेत बसायचे जेवण करायचे आणि आपापल्या गाड्या सांभाळायच्या. जर आपल्या अवतीभोवती कोणी समाज कंटक फिरताना दिसत असेल अफवा पसरविण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला पकडून पोलिसांच्या हवाली करा. तुम्ही कोणावरही हात उचलू नका हिंसा करू नका असे आवाहन त्यांनी समाजाला केले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप