हे तर येडा सरकार – नाना पटोलेंची टीका

पुणे, २३ जानेवारी २०२४: हे सरकार लोकांना येड समजत आहे. पण आधी एकनाथ देवेंद्र यांचे ‘इडी’ सरकार होत, आता त्यात अजित पवारांचा ए जोडला गेल्याने हे ‘येडा सरकार ’ आहे अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते.

मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे असे देवेंद्र फडणवीस विरोधात असताना सांगत होते, मग आता ते आरक्षण का देत नाहीत. हे सरकार मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण करत आहे,

आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलकांसह मुंबईकडे निघाले आहेत. ते मुंबईत पोहचले तर काय स्थिती होईल याचा विचार गृहमंत्री फडणवीस यांनी केला पाहिजे. मराठा आंदोलकांना मुंबईत यावे लागत आहे हे सरकारचे पाप आहे. राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी सगळे श्रीमंत लोक उपस्थित होते, पण गरिबांचे सरकारला काही पडले नाही, राम हा गरिबांचा सुद्धा आहे.

उमेदवारीसाठी अंतर्गत सर्वेक्षण पुण्यात लोकसभेसाठी २० जणांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिल्लीत जाऊन नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन फिल्डींग लावण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत पटोले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानंतर आता केंद्रीय काँग्रेस कमिटीसह प्रदेश काँग्रेसने देखील अंतर्गत सर्वेक्षण सुरु केले आहे. जो सक्षम उमेदवार असेल, त्यालाच उमेदवारी दिली जाईल.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप