आपला अभिनय पडद्यावर दाखवा, पत्रकारांच्या कॅमेऱ्यासमोर नाही – खासदार सुजय विखेंचा कोल्हेंना खोचक टोला
अहमदनगर, १५ जानेवारी २०२४: कांद्याची देशामध्ये उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या दरांवर नियंत्रण राहावे या उद्देशाने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. मात्र कांदयाला चांगला भाव मिळत असताना केंद्राच्या या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक झालं. दरम्यान, खासदार अमोल कोल्हेंनी कांदा प्रश्नाबाबत शासनाने काहीतरी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावी, अशी मागणी केली. त्याला आता खासदार सुजय विखेंनी प्रत्युत्तर देतल’‘पत्रकारांच्या कॅमेरासमोर अभिनय करून चालत नाही.
जनतेला अमोल कोल्हे यांची वास्तविकता माहित आहे’’, असा टोला लगावला.
आज खासदार सुजय विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कांदा प्रश्नाबाबत शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा, कांदा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली. त्याविषयी विखे म्हणाले, खासदार अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत. पत्रकार देखील त्यांना पत्रकार परिषदेच्या अगोदर ॲक्शन असं म्हणत असतील आणि मगच ते बोलत असतील. मात्र माझी त्यांना विनंती असेल की तुम्ही रुपेरी पडद्यावर आपला अभिनय करावा. पत्रकारांच्या कॅमेरासमोर अभिनय करून चालत नाही. जनतेला अमोल कोल्हे यांची वास्तविकता माहित आहे, असा टोला विखे यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून कोल्हे चांगलेच सक्रीय झाले. हाच धागा पकडून पुढं बोलतांना विखे म्हणाले की, गेली साडेचार वर्ष खासदार कोल्हे हे घोड्यावरच होते. आता कुठे ते खाली उतरले आहे आणि फिरू लागले आहेत. मात्र जनता त्यांना पुन्हा एकदा घोड्यावरच बसवणार मला पूर्ण विश्वास आहे, असंही खा. विखे म्हणणाले.
कांदा निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्न, दुध उत्पादकांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता. शेतकरी आक्रोश मोर्चात बोलतांना अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे यांना शेतकरी प्रश्नांवर सरकावर चांगलीच टीका केली होती. शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्यानं कांदा निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली होती. अजित दादांचा एवढा दरारा असेल तर त्यांनी केंद्र सरकारला बोलावं अन् कांदा बंदी उठवावी, असंही कोल्हे म्हणाले होते.