नार्वेकरांचा निर्णय म्हणजे भाजपच्या निती शून्य राजकारणावर मोहरच – मुकुंद किर्दत यांचे टीका
पुणे, १० जानेवारी २०२४: भाजपने राजकारण करताना सत्तेसाठी नीतिमत्ता सोडून दिलेली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्रते संदर्भात दिलेला निर्णय म्हणजे भाजपच्या नीती शून्य राजकारणावर मोहरच उमटवलेली आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली.
पक्षांतरबंदी कायद्यातील आणि पक्षाच्या घटनेतील पळवाटा शोधून त्याच्या आधारे सोयीचा अर्थ लावून शिंदे गटावर मान्यतेची मोहोर नार्वेकरानी उमटवली. हेही पात्र, तेही पात्र यात मतदार मात्र मुर्ख ठरवला गेला आहे. एक गट पात्र आहे पण तरीही दुसरा गटही अपात्र नाही यामुळे हा न्याय नसून एक भाजप च्या सोयीचे राजकीय निर्णय आहे.
आता मतदाराला मतपेटीतून न्याय मिळवावा लागेल.गेले काही वर्षे राज्यपाल व तत्सम व्यक्तिमार्फत लोकनियुक्त सरकारांच्या कामात हस्तक्षेप, त्यांना उलथवून लावण्याचे विविध मार्ग वापरले जात आहेत.
दुसरीकडे आजच्या निर्णयामुळे २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीत प्रचार, युती पाहून मतदान केलेल्या मतदारांच्या जो अवमान गेल्या ४ वर्षात झाला त्याला आणखी एक नवा डाग दिलेला आहे हेही लक्षात घ्यावे लागेल, असे किर्दत यांनी सांगितले.