“भुजबळांच्या मनात मराठ्यांविषयी विष” – मनोज जरांगे पाटील यांचे टीका
बीड, २३ डिसेंबर २०२३ : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेली मुदत २४ डिसेंबर रोजी संपत असताना आज म्हणून जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला कडक इशारा दिला. “तुम्हाला फक्त छगन भुजबळच महत्त्वाचे वाटत असेल तर आमचे काही हरकत नाही. त्यांच्या त्यांनाच तुम्ही महत्त्व द्या, पण भुजबळांच्या मनात मराठ्यांविषयी किती विष आहे. हे पण समोर आलेले आहे,” अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
जरांगे पाटील यांची आज बीड येथे जाहीर सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. “गेल्या पाच महिन्यापासून सरकारशी आमची चर्चा सुरू आहे त्यांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली पण सरकारने काहीही केलेले नाही. आता चर्चा करण्यासाठी सरकारचे फोन येत आहेत. गिरीश महाजन साहेबांचा ही आज सकाळी फोन येऊन गेला, पण आणखीन किती दिवस नुसती चर्चा करायची ? आम्हाला निर्णय अपेक्षित आहे. समितीच्या कामावर आम्ही समाधानी नाहीत. राज्य सरकारने हे आंदोलन गांभीरतेने घेतले पाहिजे. पण एकाच व्यक्तीच्या सांगण्यावरून सरकार सर्व काही करत आहे त्याने सांगितलं की कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवा, अटक करा, ट्रॅक्टर चालकांना नोटीस पाठ वा, हे सर्व काही सुरू आहे. पण सरकारला याची किंमत मोजावी लागेल. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी आम्हाला गांभीर्याने घ्यावे असा इशाराही जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला.
आम्ही समंजस्याने आंदोलन करत आहोत सरकारने देखील समंजस्याची भूमिका घ्यावी यापूर्वी आमच्यावर हल्ला करून एक मोठी चूक केलेली आहे ही चूक पुन्हा करू नका आम्ही काय म्हणतो होते गांभीर्याने घ्या असे जरांगे पाटील म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप