रुग्णांच्या मृत्यूवरून विधानसभेत आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, विरोधकांचा सभात्याग

नागपूर, १४ डिसेंबर २०२३: बुलडाणा व गडचिरोलीतील शासकीय रुग्णालयात महिलांच्या मृत्यूवरून विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी आरोग्य विभागावर संताप व्यक्त केला. विरोधकांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करीत सभात्याग केला. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात शासकीय गडचिरोली जिल्हा महिला व बालरुग्णालय आणि बुलडाणा येथील महिला रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एकूण तीन महिलांचा मृत्यू झाला. यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वर्षा गायकवाड, राजेश टोपे, सुभाष धोटे, विरोधकांनी सभात्याग केला. तत्पूर्वी, सत्ताधारी सदस्यांकडून आरोग्यमंत्री लक्ष्य नाना पटोले तसेच सत्ताधारी बाकांवरील योगेश सागर यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले.

आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे विदर्भात जीव जात असून संबंधित डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का, असा सवाल केला. मंत्री खाजगीकरणात गुंतल्याचा आरोप करीत त्यांनी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इतर विरोधी सदस्यांनीही त्यांच्या मागणीला बळ दिले. त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. अखेर विरोधकांनी सभात्याग केला. त्यापूर्वी डॉक्टरांचा हलगर्जीपणा झाला नसून दोषी नसल्याचा नसल्याचा निर्वाळा दिल्याने वर्षा गायकवाड यांनी डॉ. सावंत यांना चांगलेच धारेवर धरले. सुभाष धोटे यांनीही  डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असून कारवाई करणार काय, असे सवाल केला. डॉ. सावंत यांनी एसीएसच्या माध्यमातून चौकशी करून १५ दिवसांत अहवाल मागवू असे जाहीर केले. परंतु संजय गायकवाड यांनी चोराच्या हाती चौकशी करीत असल्याचा आरोप केला.

सत्ताधारी आमदारांनीही केली टीका

सत्ताधारी बाकावरील योगेश सागर यांनीही आरोग्य विभागाचे वाभाडे काढत आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना लक्ष्य केले. त्यांनीही डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचे ठणकावून सांगितले. गर्भातच बाळाचा मृत्यू झाल्यानंतर पाच तास महिलेला फिरवले. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगून त्यांनी डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली. केवळ उत्तर देऊन मंत्र्यांनी मोकळे होणे बरे नाही, असेही ते म्हणाले. त्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार करून मुख्यमंत्री सहायता निधीतून सहकार्य का घेतले नाही, असा सवालही त्यांनी केला.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप