‘जर्मन शिका, ४ लाख नोकऱ्या वाट बघतायत’ : अजितदादांचा बेरोजगारांना परदेशात जाण्याचा सल्ला

नागपूर, १४ डिसेंबर २०२३ : पी.एचडीच्या वक्तव्यावरुन सुरु झालेला वाद अद्याप शमला नसतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेरोजगार तरुणांना ‘जर्मन’ भाषा शिकण्याचा सल्ला दिला आहे. ज्या तरुणांनी प्लंबर, फीटर आणि इतर तत्सम कोर्स केले असतील त्यांनी जर्मन भाषा शिकावी. तिथे चार लाख नोकऱ्या उपलब्ध आहेत, असा सल्ला पवारांनी दिला आहे.

अजित पवार नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले, पीएचडी बद्दल माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. पीएच.डी हे महत्त्वाचं शिक्षण असून, त्यात खूप अभ्यास करावा लागतो. पीएच.डी करण्यावर दुमत नाही. अनेक जण विविध विषयात पीएचडी करतात. जर्मन भाषेत पीएच.डी केल्यास अधिक फायदा होईल.
मला काही दिवसांपूर्वी मिळालेल्या माहितीप्रमाणे ज्या तरुणांनी प्लंबर, फीटर असे कोर्स केले असतील त्यांनी जर्मन भाषा शिकावी. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे तिथे चार लाख नोकऱ्या आहेत. ज्या तरुण-तरुणींना परदेशात जाऊन नोकऱ्या हव्या असतील त्यांनी या संधीचा फायदा घ्यावी अशी आमची भूमिका आहे, असे ते म्हणाले.
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यात १२ डिसेंबरला सभागृहात पीएचडी फेलोशिपवर चर्चा सुरु होती. यात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी यंदाच्या वर्षापासून सरकारने फक्त २०० विद्यार्थ्यांनाच फेलोशिप देण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयात सुधारणा करण्याची मागणी केली होती.

खासदार सुजय विखेंच्या मेंदूत केमिकल लोचा; ठाकरे गटाच्या नेत्याची खोचक टीका त्यावर अजित पवार यांनी पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार आहेत, असा उलटा सवाल विचारला होता. त्यांच्या या वक्तव्यावरुन नवा वाद उभा राहिला. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांतून पवारांवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप