सरकारने शब्द पाळला नाही तर आम्ही जरांगेसोबत उभे राहू – बच्चू कडूंचा सरकारला रोखठोक इशारा

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेले उपोषण मनोज जरांगे यांनी नवव्या दिवशी मागे घेतले आहे. शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतर जरांगे यांनी सरकारला दोन महिन्यांची मुदत दिली आहे. २ जानेवारीपर्यंत आरणक्षणाचा निर्णय न झाल्यास ३ जानेवारीनंतर मुंबईच्या सगळ्या वेशींवर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. याकाळात साखळी उपोषणही सुरु राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले होते. सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी तर शिंदे सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

कडू म्हणाले, सरकारने शब्द पाळला नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ताकदीने उभे राहू.२४ तारीख म्हणून सरकारला काम करावं लागेल. सरकारने २४ तास काम करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं. निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला पाहिजे. ७५ वर्षांपासून मराठा समाज उपेक्षित राहिला आहे. मराठा कुणबी नाही तर कोण आहे, असा सवाल उपस्थित करत सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे, असे कडू म्हणाले.

सरकारने दगाफटका केला तर त्यांच्या नाड्या आवळू. त्यांच्या र्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक नाड्या आवळू.. थेट मुंबईत जाऊन बसायचं… त्यांना भाजीही द्यायची नाही. त्यामुळं दगाफटका बसला तर आत्तापासूनच तयार राहा, असंही जरांगे म्हणाले. उपोषण मागे घेतलं तरी साखळी उपोषण सुरूच राहणार. आपल्याला आंदोलनाची दिशा बदलायची आहे. तालुका, जिल्हा, गावपातळीवर जाऊन व्यापक आंदोलन करायचं. मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या घराचा उंबरठाही ओलांडणार नाही. मी मराठ्यांचा अपमान होऊ देणार नाही. लेकरायची शपथ घेऊन सांगतो, सरकारच्या बाजूनं जाणार नाही, असंही जरांगेंनी स्पष्ट केलं.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप