पुणे: गोपीचंद पडळकर यांच्या पुतळ्याला राष्ट्रवादीने मारले जोडे, अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यांवरून वाद

पुणे, १८ सप्टेंबर २०२३: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या “अजित पवार हे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे, आम्ही त्यांना मानत नाही त्यांनी. धनगर समाजाला आरक्षणाचे पत्र देण्याची गरज नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यावरूनच पुण्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे पडळकर यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पवार कुटुंबीयावर गोपीचंद पडळकर या माथेफिरूने अत्यंत हिन भाषा वापरून त्यांच्याविषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने बालगंधर्व चौक येथे पडळकर च्या फोटोस जोडे मारो आंदोलन करण्यात आले ,”चोरीचा छंद गोपिचंद “ , “पिसाळलेल कुत्र गोपिचंद “ , “गोप्याच्या बैलाला धो “ अशाप्रकारच्या धोषणा देण्यात आल्या .
शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले, पडळकरने अशा प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे त्याला पुणे शहरांमध्ये आल्यावर त्याचे कपडे उतरून त्याला चोप देवू. त्याला त्याच प्रकारे उत्तरे देण्यात येईल प्रसिध्दीच्या हव्यासापोटी त्याने हे वक्तव्यकरून वातावरण गढूळ करू नये.

कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाले की महाराष्ट्रच्या विकासाच्या मुद्द्यावरून आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत यात कोणतीच कटुता येवू नये यांचे सर्वांनीच भान ठेवायला हवे याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना देशमुख यांनी विनंती केली की गोपीचंद पडळकर हा पिसाळलेला श्वान आहे व याला आवरणे गरजेचे आहे पुणे शहरांमध्ये येरवडा येथे मनोरुग्ण रुग्णालय आहे आपण जर या ठिकाणी त्याला पाठवला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण खर्च करून याचा आजार बरा करण्याकरता आम्ही निश्चित प्रयत्न करू.

शहराघ्यक्ष दीपक मानकर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रूपाली ठोंबरे ,प्रिया गदादे, सदानंद शेट्टी, आप्पा रेणुसे, समीर चांदेरे ,दत्ता सागरे , ,शुभम माताळे, पूजा झोळ, हरेश लडकत, गुरूमित गिल , शांतीलाल मिसाळ , अभिषेक बोके , अजय दराडे व इतर पदाधिकारी मोठेया संख्येने उपस्थित होते.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप