मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी ‘फाईव्ह-स्टार’ थाट

संभाजीनगर, १५ सप्टेंबर २०२३: राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुंबई ऐवजी संभाजीनगर येथे होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री व मंत्री शासकीय विश्रामगृहात मुक्काम न करता ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणार आहेत. यासाठी संभाजीनगर आतील हॉटेलमध्ये बुक करण्यात आलेले आहेत. यामध्ये खर्च करावा लागणार आहे.

महाराष्ट्राचा मागील इतिहास पाहता माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांचा मुक्काम सरकारी विश्रामगृहात असायचा. यंदाचं चित्र कदाचित वेगळे असण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल रूम्स बुक करण्यात आले आहेत. रामा हॉटेसमधील एकूण ३० रूम बुक करण्यात आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्री या काळात वास्तव्य करणार आहेत. तसेच, शहरातील ताज हॉटेलमध्ये ४० रूम बुक करण्यात आले आहेत. यामध्ये सर्व सचिव वास्तव्य करतील.

अमरप्रीत हॉटेलमध्ये ७० रूम बुक करण्यात आले आहेत. यामध्ये उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी वास्तव्य करणार आहेत. अजंता अँबेसडेर हॉटेलमध्ये इथेही ४० रूम बुक आहेत. येथे उपसचिव आणि खासगी सचिव राहतील. तर महसूल प्रबोधिनीमध्ये १०० रूम्स बुक आहेत. येथे सुरक्षा रक्षक, वाहनचालक यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. पाटीदार भवनात १०० रूम बुक केले आहेत इथेही सुरक्षा रक्षक, वाहनचालक राहतील.