अजित पवार म्हणाले वळसे पाटील बोरबरच

मुंबई, २१ ऑगस्ट २०२३: सरकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठिंबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे, असं म्हणतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट दिलीप वळसे पाटील यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे.

काल (२० ऑगस्ट) वळसे पाटील यांनी मंचर येथील एका मेळाव्यात बोलताना, “शरद पवार यांना आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही, असा दावा केला होता. आपल्याकडे शरद पवार यांच्यासारखे उत्तुंग नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात, नंतर कोणाशी तरी आघाडी करावी लागते. देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. पण, महाराष्ट्रातील जनतेनं शरद पवार यांना बहुमत दिलं नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आलं नाही. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या”, असं ते म्हणाले होते.

वळसे पाटील यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार गट आक्रमक झाला आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांनी वळसे पाटील यांना कृतघ्न म्हंटले होते. कार्यकर्त्यांनी तर मंचर आणि मुंबई येथे वळसे पाटलांच्या विरोधात आंदोलन केले. या टिकेनंतर आज ट्विटरच्या माध्यमातून वळसे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हंटले.

मात्र यानंतरही आता अजित पवार यांचा गट वळसे पाटील यांच्या पाठिशी उभा राहिला आहे. अजित पवार गटाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच ट्विटर नवीन अधिकृत अकाऊंट उघडण्यात आले आहे. त्यावरुन, नामदार दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठींबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे, असे म्हंटले आहे.

याचाच अर्थ या दोन्ही गटातील वाद लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. शरद पवार यांच्यावर व्यैयक्तिक हल्ले करण्यासहित अजित पवार गट मागे-पुढे पाहणार नसल्याचे पक्षाच्या आजच्या ट्विटमधून दिसून येते. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डेलवरुन ही अजित पवार यांचीच भूमिका आहे हे देखील तितकेच स्पष्ट आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप