अजित पवार यांनी २० वर्ष माझ्या मतदारसंघात एक रुपया ही दिला नाही – गिरीश महाजन
मुंबई, ६ आॅगस्ट २०२३ : पुण्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्याबाबत गिरीश महाजन यांनी त्यांचे धन्यवाद मानत असताना दादा हे शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी मला सांगितले होते की तुला एक रुपया सुद्धा मी निधी देणार नाही. त्यानुसार त्यांनी मला वीस वर्षात एकदाही निधी दिला नाही त्यांनी कौतुक प्रत्युत्तर दिले.
भाजपा नेते सनी निम्हण यांनी आज पुण्यात आपले वडील आणि माजी आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त महाआरोग्य शिबीराचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी भाजपाचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आरोग्य शिबीराच्या निमित्ताने अजित पवारांनी गिरीश महाजनांच्या फिटनेसची स्तुती केली. यावर आता गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांबरोबर माझा सुरुवातीपासून राजकीय विरोध होता. त्यांनी २० वर्षांच्या कार्यकाळात माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नाही. निधी देणार नाही, असं आव्हान त्यांनी मला दिलं होतं. त्यांनी त्यांचा शब्द पाळला, कारण अजित पवार शब्दाचे पक्के आहेत. आता आम्ही मित्र झालो आहोत. त्यामुळे ते माझं कौतुक करत होते. ते नेहमी मला भेटले की माझे बायसेप (दंड) तपासतात, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अजित पवारांनी फिटनेसचं कौतुक केल्याबाबत विचारलं असता गिरीश महाजन म्हणाले, “आज मैत्रीदिवस आहे. अजित पवार आणि माझा सुरुवातीपासून एकमेकांना राजकीय विरोध होता. अजित पवारांनी वीस वर्षांच्या कार्यकाळात माझ्या मतदारसंघासाठी एक रुपयाही दिला नव्हता. त्यांनी मला आव्हान दिलं होतं की, तुझ्या मतदारसंघात एक रुपयाही देणार नाही. त्यांनी त्यांचा शब्द पाळला. कारण अजित पवार शब्दाचे पक्के आहेत. आम्ही आता मित्र झालो आहोत. आज ते माझं कौतुक करत होते
“अजित पवार जेव्हा मला भेटतात, तेव्हा ते नेहमी माझे बायसेप (दंड) बघतात आणि विचारतात, हे कसं केलं? मी त्यांना सांगतो, की दादा रोज व्यायाम केला पाहिजे. मी रोज एक तास जिममध्ये जातो. खाण्या-पिण्यावर माझे खूप निर्बंध आहेत. मी तळलेले पदार्थ कधीच खात नाही. मी हॉटेलमध्ये कधीच जेवत नाही. प्रवासात असलो तरी मी घरचं जेवण जेवतो. मी एखाद्या कार्यकर्त्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून पोळी-भाजीचा डब्बा मागवून घेतो आणि गाडीतच जेवतो. पण मी बाहेरचं खात नाही. केवळ राजकारणी लोकानीच नव्हे तर प्रत्येकानं या गोष्टी पाळल्या पाहिजेत. प्रत्येकानं आपलं आरोग्य जोपासलं पाहिजे,” असंही गिरीश महाजन पुढे म्हणाले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप