मोदींच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनावरून भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
पुणे, २४ जुलै २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणार आहेत. त्यावेळी ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत यावरून शहर भाजप मधील पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत बाद उकळणार आहे भाजपचे माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी दगडूशेठ हलवायचे दर्शन घेतानाच ग्रामदैवत कसबा गणपतीची देखील दर्शन घ्यावे अशी मागणी मोदी यांच्याकडे केलेली आहे त्यामुळे स्थायी समितीचे माती अध्यक्ष हेमंत रासने यांना यातून लक्ष करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
शिवकालीन कसबा गणपती याचा मान पहिला असतो. तसेच ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी देवी पुण्याची ग्रामसंरक्षक देवता आहे. आपण पुण्यामध्ये आल्यावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असल्याचे बातमीमध्ये कळले. आमची आपणास पुणेकर म्हणून विनंती आहे, पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती आणि ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी यांचे देखील दर्शन आपण घ्यावे, राजमाता जिजाऊ यांनी १६४० साली पुणे वसवताना या मंदिराची पायाभरणी केली होती आणि याला ग्रामदेवताचा दर्जा दिला होता. पुणेकर नागरिकांच्या भावना या मंदिराशी जोडल्या गेल्या आहेत आपण नागरिकांच्या हिताचे आणि भावनेचे निर्णय घेण्यास मशहूर आहात.
आमची आपणास विनंती आहे आपण कसबा गणपती आणि ग्रामदेवता जोगेश्वरी माता तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमास जावे , अशी मागणी उज्वल केसकर सुधीर कुलकर्णी प्रशांत बधे यांनी केलेली आहे.
दरम्यान यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील दहशत हलवाईचे दर्शन घेतले होते. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी दर्शनाला येत आहेत. दगडूशेठ गणपतीच्या विश्वस्त मंडळपदी भाजपचे माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आहेत. त्यामुळे ते भाजपचे नेत्यांना दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी घेऊन येतात. हेच निमित्त साधत भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी आता मोदींना कसबा गणपती दर्शन घ्यावे अशी मागणी केलेली आहे. त्यानिमित्ताने रासनी यांचे विरोधक सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे.