अजित पवार यांचा ‘पॉवर’ गेम; ‘ वजनदार ‘ खाती गळ्याला
मुंबई, १४ जुलै २०२३ : शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश झाल्यानंतर या गटाच्या नऊ मंत्र्यांचे खाते वाटप गेल्या अकरा दिवसापासून रखडलेले आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना महत्त्वाचे खाते देऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे आमदार विरोध करत होते. अखेर अजित पवार यांचा पॉवर गेम यशस्वी झाला आहे. त्यांच्या सर्व मंत्र्यांना चांगले खाते मिळालेले असून शिवसेनेच्या वाट्याचे दोन मंत्री पदे देखील हिसकावून घेतलेली आहेत.
गेल्या एका वर्षापासून राज्यात शिंदे फडणवीस सरकार कार्यरत असताना त्यामध्ये आता अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील समावेश झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठकडून ५४पैकी ४०आमदार अजित पवार यांच्या बाजूने आहेत. त्यापैकी नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आलेली आहे. गेल्या ११ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मंत्र्यांना कोणती खाते द्यायची यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार हे स्वतः त्यांना वित्त खाते हवे यासाठी भाजपवर दबाव टाकत आहेत. तर महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांनी शिवसेनेचे आमदारांना निधी दिलेला नव्हता त्यामुळे अजित पवार यांना वित्त खाते देऊ नये त्यासाठी कडाडून विरोध सुरू आहे. या संदर्भात दिल्लीत बैठका झाल्या तरीही तोडगा निघत नव्हता. या वादामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार देखील रखडलेला आहे. सोमवारपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असताना मंत्रिमंडळाचा विस्तार व यांना खाते देणे आवश्यक आहे. त्यासाठी आज अखेर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात येणाऱ्या खाते वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामध्ये अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केल्याचेच दिसून येत आहे.
भाजपकडे असणारं वित्त व नियोजन, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालकल्याण, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, क्रिडा ही खाती राष्ट्रवादीकडे तर शिवसेनेची कृषी आणि अन्न व औषध प्रशासन खात राष्ट्रवादीला देण्यात आली आहेत.
साधारणपणे असे असेल राष्ट्रवादीचे खाते वाटप
वित्त व नियोजन – अजित पवार
कृषी – धनंजय मुंडे
सहकार- दिलीप वळसे पाटील
वैद्यकीय शिक्षण – हसन मुश्रीफ
अन्न नागरी पुरवठा – छगन भुजबळ
अन्न आणि औषध प्रशासन – धर्मराव अत्राम
महिला आणि बालकल्याण – अदिती तटकरे
क्रीडा व युवक कल्याण, बंदरे – संजय बनसोडे
मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन – अनिल पाटील
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप